Sunday, December 27, 2009

मी गातो एक गाणे...

"रात लाजुनिया गेली, दिले पहाट बहाणे
पाना-पानात ठेवले तिने दवाचे उखाणे"

Its amazing how Sandeep creates magic with sheer imagination! Just follow the words and you enter into a totally enchanting, mesmerizing world!

"आळसावल्या नदीची अशी मोहक वळणे
वेड लावित नभाला तिचे स्वतःत नहाणे"

"तुझ्या डोळ्यातल्या रानी असे रानभरी होणे
अशा वनात कबूल आम्हा वनवासी होणे"

Romance, at a totally different level! :)
Hats off to you Sir! Keep the good work flowing in, we want more!

विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे...

आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे

विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे
अग्निच्या ज्वाळांतुन फूलते लवलव लपलप गाणे

वेळूच्या वार्यातुन झुलते मंजुळ मुरली गाणे
पाण्यामधुनी वाहात असते अवखळ खळखळ गाणे
वीज नभाची गाउन जाते कडाड कडकड गाणे
महाभुतांच्या ह्रुदयांतरीही अमीट असते गाणे,
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे
हसण्याचेही होते गाणे, फसण्याचेही गाणे

असण्याचेही असते गाणे, नसण्याचेही गाणे
आनंदाचे खजीने आन्दण अन दुख्खाला देते कोंदण,
सदैव रुंजी घालत आहे मनीमानसी गाणे
आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे
- संदीप खरे

Just fantastic!